भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणजेच क्रिकेटचा देव. असं म्हणतात की क्रिकेट कसं खेळावं, कसा क्रिकेटपटू असावा, याचा देवाने एक साचा बनवला तो साचा म्हणजे सचिन तेंडुलकर आणि देवाने तो साचा पुन्हा कधी बनवलाच नाही. सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कट किंवा बॅकफूट पंच म्हणजे 'पोएट्री इन मोशन'. सचिन तेंडुलकरचं क्रिकेटसाठीचं प्रेम अपार आहे, त्याचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. सचिनची अजून चांगला क्रिकेटपटू होण्याची सततची धडपड, एका लहान मुलाप्रमाणे नवीन गोष्टी शिकण्यासाठीचं आकर्षण हे त्याला अजून महान बनवतं. सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीबाबत भरपूर बोललं जातं, पण सचिनच्या गोलंदाजीबाबत जास्त बोललं जात नाही. सचिनला त्याच्या चांगल्या गोलंदाजीचं तितकंसं श्रेय दिलं जात नाही. सचिनने आजवर त्याच्या गोलंदाजीने सध्या केले कोणते कीर्तिमान आहेत, याबाबत जाऊन घेऊया.
हेही वाचा – Match Fixing Case: क्रिकेटवर बिश्नोई गँगची दहशत; धमकीनंतर बदलला टी-20 वर्ल्डकपमधील 'या' संघाचा कर्णधार
सचिन तेंडुलकर विश्व क्रिकेटमध्ये एकटाच असा गोलंदाज आहे ज्याने शेवटच्या ओव्हरमध्ये 6 किंवा 6 पेक्षा कमी धावांचं आव्हान बचाव करून सामना त्याच्या संघासाठी जिंकवला आहे . हे त्याने 1993 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलं आणि 1996 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलं. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8,054 बॉल्स टाकले आहेत हे शोएब अख्तरपेक्षादेखील जास्त आहे. शोएबने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7764 बॉल्स टाकले आहेत. सचिन तेंडुलकरने दोन वेळा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेतले आहेत, जे शेन वॉर्न, कपिल देव, जहीर खान, स्टुअर्ट ब्रॉड, इम्रान खान, कर्टनी वॉल्श यांच्यापेक्षा जास्त आहेत.
इतकंच नाही तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने 154 विकेट्स घेतल्या आणि हे जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्सपेक्षा जास्त आहेत. सचिनची एकदिवसीय क्रिकेटमध्ये 32 धावा देऊन 5 विकेट्स घेतेले ही त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम आहे. ही त्याची गोलंदाजीतली गोलंदाजीतील सर्वोत्तम जहीर खान, जुगलं श्रीनाथ आणि जेसन गेलेस्पी यांच्यापेक्षा चांगली आहे.
हेही वाचा – IPL 2026 | IPL 2026 मध्ये कोणत्या संघात किती महाराष्ट्राचे खेळाडू ? 'या' एका संघात एकही मराठमोळा खेळाडू नाही
सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 154 विकेट्स घेतल्या आहेत आणि कसोटी क्रिकेटमध्ये 46 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनदा एका सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आहेत तर एका सामन्यात 4 वेळा 4 विकेट्स घेतल्या आहेत.
सचिन तेंडुलकर फिरकी गोलंदाज होता. तो ऑफ स्पिनर किंवा लेग स्पिनर नव्हता. त्याला दोन्ही कला अवगत होत्या. हेच नाही, तर तो मध्यमगती गोलंदाजीदेखील करायचा. मध्यमगती गोलंदाजी करून त्याने ब्रायन लारा याला बाद केलेलं. सचिन तेंडुलकर लेग स्पिन, ऑफ स्पिन, टॉप स्पिन, गुगली आणि 'दूसरा' ही गोलंदाजीतील सर्व मिश्रणे त्याला अवगत होती. सचिन 10 कर्णधारांच्या हाताखाली खेळला आणि प्रत्येकासाठी तो 'मॅन विथ द गोल्डन आर्म' होता, म्हणजे जेव्हा विकेटची गरज असायची तेव्हा तो विकेट घेऊन द्यायचा. तशी ही गोष्ट थोडीशी दुर्दैवी आहे की सचिनच्या गोलंदाजीबाबत बोललं जात नाही. सचिन तेंडुलकरला भारताचा पहिला 'मिस्ट्री स्पिनर' होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.